Join us  

विजय चव्हाण यांच्या जाण्याने एक उत्तम कलाकरासोबत एक उत्तम माणूस आपण गमावला - विजय कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:19 AM

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली.

ठळक मुद्देआमचा प्रवास महाविद्यालयातून एकत्र सुरु झालाअतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.   

''आमचा प्रवास महाविद्यालयातून एकत्र सुरु झाला. शेवटच्या वर्षाला मी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेमध्ये त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. अतिशय हरहुन्नरी व्यक्ति आज आपल्यातून निघून गेला आहे. एक उत्तम कलाकरासोबत एक उत्तम माणूस देखील आज आपण गमावला आहे. खरंतर आमचं घराच्यासारखे संबंध होते. ते आमच्या घरी आलं की एक वेगळेचं आनंदी वातावरण निर्माण व्हायचे. बरेच दिवस घरी ते घरी आले नाही की, माझे आई-वडिल दोघेही त्यांच्याबाबत माझ्याकडे विचारापूस करायचे. एखादी गोष्ट शिकताना ते स्वत:ला त्यात झोकून द्यायचे.'' अशी प्रतिक्रिया त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते विजय कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.    

विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या नेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.  मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते.

टॅग्स :विजय चव्हाणविजय कदम