Join us  

VIDEO: रिंकू राजगुरूचा नवीन लूक पाहिलात का?, अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 2:02 PM

रिंकू राजगुरूने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रिंकू राजगुरूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओ रे पिया या गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसते आहे. तिच्या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

तसेच रिंकू राजगुरूने नुकताच नवा लूक केला आहे. तिचा नवा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रिंकू राजगुरू सध्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये रिंकूसोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर दिसणार आहेत. तिच्या या प्रोजेक्टच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र शूटिंगच्या सेटवरून हा कोर्ट रुम ड्रामा असेल.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2