Join us

अभिनेत्री वैदही परशुरामीने अशा दिल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 12:01 IST

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

 सोशल मीडियाच्या माध्यमातून वैदही परशुरामी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वैदहीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिने एक साडीतला फोटो शेअर केला आहे. गुढी पाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मागचे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेले...या नव वर्षांत निसर्गाने शिकवलेले धडे गिरवण्याचा प्रयत्न करूया!  हा सण यंदा आपण घरी राहून आपल्या कुटुंबीयांबरोबर साजरा करूया! असे कॅप्शन वैदहीने आपल्या फोटोसोबत दिले आहे. 

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.

टॅग्स :वैदेही परशुरामी