Join us

प्रेमाच्या महिन्यात 'सिंगल' लोकांसाठी वैभव तत्ववादीचा खास मेसेज, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:43 IST

वैभव तत्ववादीचा खास व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Vaibhav Tatwawadi: नवीन वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारी महिना हा विविध अंगांनी खास आहे. अनेकजण हा महिना प्रेमाचा महिना म्हणूनही साजरा करतात. प्रेम हे प्रत्येकासाठी खास असते. प्रेम साजरे करायला काही वेळ काळ आणि दिवस लागत नाहीत. मात्र तरीही फेब्रुवारी हा खास महिना प्रेमाचा महिना मानला जातो. ७ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण आठवडा हा खास प्रेमीयुगुलांसाठीच असतो.  या वर्षातला Valentines Day (१४ फेब्रुवारी) नुकतंच झाला. या खास दिवशी अनेक प्रेमी युगलांनी एकमेंकावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. अनेकांनी प्रेमाबद्दल खास कविता सादर केल्या. पण, जे लोक सिंगल आहेत, अशासाठी अभिनेता वैभव तत्ववादीनं खास मेसेज दिलाय. 

वैभव तत्ववादीचा खास व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या Valentines Day च्या दिवशी वैभव तत्ववादीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. जो व्हायरल झालाय.  प्रेमाच्या महिन्यात 'सिंगल' लोकांसाठी त्यानं म्हटलं, 'चलो ख़्वाब पूरे करते हैं इश्क़ शायद अधूरा ही अच्छा है'. यासोबत त्यानं हसरे इमोजी जोडतं कॅप्शनमध्ये लिहलं, "तुमच्या सर्व 'सिंगल' मित्रांना हे पाठवा". वैभवच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत प्रेमाचा वर्षाव केलाय.

वैभव तत्तवादी हा लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. त्त्याच्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. मराठी कलाविश्वातील हँडसम हंक त्याला म्हटलं जातं. वैभवनं उत्तम अभिनय कौशल्य आणि पर्सनालिटीच्या जोरावर अफाट लोकप्रियता मिळवली आहे. मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती. तर यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०' सिनेमातदेखील तो झळकला आहे

टॅग्स :वैभव तत्ववादीव्हॅलेंटाईन्स डेसेलिब्रिटीमराठी अभिनेता