Join us

​ वैभव-संजय पहिल्यांदाच येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:17 IST

 वैभव तत्ववादी आणि दिग्दर्शक संजय जाधव हे लवकरच एकत्र चित्रपट करणार असल्याचे समजतेय. वैभव आणि संजयचे एकत्र फोटो नुकतेच ...

 वैभव तत्ववादी आणि दिग्दर्शक संजय जाधव हे लवकरच एकत्र चित्रपट करणार असल्याचे समजतेय. वैभव आणि संजयचे एकत्र फोटो नुकतेच साएशल साईट्सवर व्हायरल झालेले आहेत. एवढेच नाही तर दिग्दर्शक समीत कक्कड यांनी संजय आणि वैभव या दोघांनाही या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समीत म्हणतोय, वैभव आणि संजय तुमच्या आगामी चित्रपटासाठी माझ्याकडून खुप शुभेच्छा... किल इट... आता एका दिग्दर्शकाने दुसºया दिग्दर्शकाला त्याच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या म्हंटल्यावर नक्कीच संजयचे नमोधैर्य वाढणार यात काहीच शंका नाही. संजय आणि वैभव या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटाचे नाव, कथा या कोणत्याच गोष्टीचा अजुन तरी खुलासा झालेला नाही. लवकरच या सर्व गोष्टी उलगडतील. परंतू हे दोघे एकत्र काम करणार म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळ प्रेक्षकांना लवकरच अनुभवायाला मिळणार अशी आशा करायला काहीच हरकत नाही. कारण संजय जाधव यांचे चित्रपट नेहमीच वेगळ््या आशयाचे असतात. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, काय आवडते याचे चांगले ज्ञान संजयला असल्याचे त्याच्या चित्रपटांतून दिसून येतेच. सध्या तो लग्न मुबारक नावाच्या एका मराठी चित्रपटामध्ये अभइनय देखील करीत आहे. तर वैभनवे मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये स्वत्त:च्या अभिनयाची छाप सोडलीच आहे. बाजीराव मस्तानीमधील त्याच्या अभिनयाचे सगळीकडेच कौतुक झाले आहे. तर प्रकाश झा यांच्या लिपस्टीक या हिंदी चित्रपटातही तो लवकरच दिसणार आहे. परंतू सध्या संजय आणि वैभव कोणत्या विषयावर चित्रपट करणार याची उत्सुकताच प्रेक्षकांना जास्त लागलेली आहे.