Join us  

उमेश कामतचा नवीन वर्षात नवीन संकल्प, म्हणाला - 'प्रियासोबत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 6:46 PM

Umesh Kamat: उमेश कामतने नवीन वर्षात नवीन संकल्प केला आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितले आहे.

अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. उमेश आणि प्रियाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. या दोघांची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. उमेश कामतने नवीन वर्षात नवीन संकल्प केला आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितले आहे.

उमेश कामतने प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जास्त वेळ या क्युटी (प्रिया बापट)सोबत व्यतित करण्याचा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. या पोस्टसोबत उमेशने प्रियासोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे आणि या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरीसहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेशने लग्न केले. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्यामुळे एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती.

अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला होकार दिला. उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले. 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट