Join us

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 13:33 IST

 १५ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे नुकतेच रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी दिमाखात उदघाटन झाले. प्रभादेवी येथील पु. ल. ...

 १५ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे नुकतेच रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी दिमाखात उदघाटन झाले. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, संचालक सुधीर नांदगांवकर, लघुपट विभागाचे ज्युरी मेंबर रमेश तलवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते एशियन फिल्म कल्चर अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक गोविंद निहलानी म्हणाले, आपल्या मातीतल्या गोष्टींचा तसेच संस्कृतीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि आपले चित्रपट जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणंही गरजेचं आहे. तसेच आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट चळवळीला नवी दृष्टी देण्याच्या प्रयत्नांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. आशियाई चित्रपट महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांच्या कायार्चे कौतुक करताना सुधीर नांदगांवकर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन सुधीर नांदगांवकर यांनी केले. २२ डिसेंबरपर्यंत चालणाºया सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.  तसेच या महोत्सवात लघुपटांची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्वादही या महोत्सवात घेता येणार आहे.