Join us

​‘तिचा उंबरठा’ प्रदर्शनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 08:46 IST

चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर, हर्षा खांदेपारकर, सुयश टिळक, तुलिका प्रकाश निकम, भारत शर्मा अशी सर्व स्टारकास्ट असलेला ...

चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर, हर्षा खांदेपारकर, सुयश टिळक, तुलिका प्रकाश निकम, भारत शर्मा अशी सर्व स्टारकास्ट असलेला ‘तिचा उंबरठा’ हा मराठीपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. अ‍ॅक्शन डायरेक्टर रवी दिवान यांनी ‘तिचा उंबरठा’च्या रिलिजची तयारी चालवली आहे. हे एक ग्रँड रिलिज व्हावे,असा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे हा एक महिलाप्रधान चित्रपट आहे. विभावरी ही गृहिणी एका वळणावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेते आणि हा निर्णय तिच्या आयुष्याला नवी कलाटणी देऊन जातो, अशी ही कथा आहे.