Join us  

भाऊ कदमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; थोरल्या लेकीने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:52 AM

Bhau kadam: भाऊ कदमच्या थोरल्या लेकीने या नव्या चिमुकल्या पाहुण्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 

 सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वात असंख्य विनोदवीर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, या सगळ्यामध्ये असे काही विनोदवीर आहेत, ज्यांनी आपल्या कसदार अभिनयशैलीमुळे थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे भाऊ कदम (bhau kadam). 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ घराघरात पोहोचला. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या भाऊच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याच्या थोरल्या लेकीने या नव्या चिमुकल्या पाहुण्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 

कलाविश्वात सक्रीय असलेला भाऊ सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. त्याच्याप्रमाणेच त्याची थोरली लेक मृण्मयीदेखील सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. अलिकडेच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन त्यांच्या घरी नवा पाहुणा आल्याचं दिसून येत आहे. 

मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या घरी एका चिमुकल्या कुत्र्याच्या पिल्लाचं आगमन झालं आहे. या पिल्लाचं नाव ठेवल्यानंतर तिने हे गोड फोटो शेअर केले आहेत. भाऊच्या घरी आलेल्या या नव्या पाहुण्याचं नाव डॅफ्ली असं ठेवण्यात आलं आहे. २ मे २०२२ रोजी या पिल्लाचा कदम कुटुंबात समावेश झाला.

दरम्यान, मृण्मयीने हे फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेदेखील त्यावर कमेंट केली आहे. तसंच चाहत्यांनीदेखील त्यावर कमेंट व लाइक्सचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :भाऊ कदमसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन