Join us  

दहशतवादाला धर्म नसतो; शरद पोंक्षेंचे कमल हसन यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 6:45 PM

नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता अभिनेता शरद पोंक्षे यांनीदेखील कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता अभिनेता शरद पोंक्षे यांनीदेखील कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कमल हसन यांच्यावर टीका केली आहे. 

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते असे विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केले होते. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यात आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शरद पोंक्षे यांनीदेखील सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर टीका करीत त्यांना लक्ष्य केले आहे.

शरद पोंक्षे यांनी म्हटले की, दहशतवादाला धर्म नसतो. अगदीच मान्य. पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातले वास्तव. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणे केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कुठे राहत असतील तर ते हिंदुस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांचे मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतोय तेही जाहिरपणे आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा. आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. यावर चूक बरोबर ह्यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवले जाते आहे. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हासनचा मी तीव्र विरोध निषेध करतो. आपल्याला पटले तर तुम्हीही करा. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. ता.क. तथाकथित पुरोगामींनीही निषेध करायला हरकत नाही. 

टॅग्स :कमल हासनशरद पोंक्षे