Join us

तेजस्विनी पंडितचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:00 IST

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. ब्लॅक अँड व्हाइट शेडमधील या फोटोत तेजस्विनीचा मराठमोळा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नथ आणि कपाळावर चंद्रकोर तेजस्विनीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे.

'मी सिंधुताई सपकाळ', 'तू ही रे' असे सिनेमा, विविध नाटकं आणि '१०० डेज' सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. ब्लॅक अँड व्हाइट शेडमधील या फोटोत तेजस्विनीचा मराठमोळा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नथ आणि कपाळावर चंद्रकोर तेजस्विनीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. या फोटोसह तेजस्विनीने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. या फोटोत स्वतःला परी किंवा परफेक्ट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न नसून मी जशी आहे तशी आहे अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. तेजस्विनीची ही अदा शैलेंद्र परदेशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हेअर स्टाईल आर्टिस्ट, डिझायनर आणि ज्वेलरी डिझायनर यांचाही तेजस्विनीने या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तिच्या या फोटोवर रसिकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. २०१८ हे वर्ष तेजस्विनीसाठी चांगलं ठरलं आहे. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनीचा देवा तर २०१८ च्या सुरुवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ हा सिनेमा रिलीज झाला. मुख्य म्हणजे या दोन्ही सिनेमांनी थिएटर हाऊसफुल्ल केलं. रसिकांनी या दोन्ही सिनेमांना छान प्रतिसाद दिला होता.

 

टॅग्स :तेजस्विनी पंडित