Join us

तांबडेबाबा बनले पोलिस आॅफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:20 IST

Exculsive - बेनझीर जमादारतू तिथे मी या मालिके द्वारे तांबडेबाबा या भूमिकेतून मिलिंद शिंदे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या ...

Exculsive - बेनझीर जमादारतू तिथे मी या मालिके द्वारे तांबडेबाबा या भूमिकेतून मिलिंद शिंदे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या मालिकेला संपून तीन ते चार वर्षे झाले असले तरी मिलींद शिंदेची भूमिका अजून ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. तांबडेबाबा आता, चौर्य या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या भूमिकेबाबत मिलिंदने लोकमत सीएनएकसशी साधलेला संवाद.१. चौर्य या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?-सध्या देशातच काय संपूर्ण जगात जे काही विचित्र घडत आहे त्याला  कारण म्हणजे पैसा. मंदिरे, ट्रस्ट, समाज, सामान्य माणूस या सर्व व्यवस्थेमध्ये भ्रष्ट्राचार वाढत आहे. या सर्व व्यवस्थेमधील मी एका पोलिस आॅफिसरची भूमिका साकारली आहे. २. या चित्रपटात पॉझिटिव्ह की निगेटिव्ह भूमिका आहे?- खरं तर माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे या गोष्टीला मी महत्व देत नाही . कथा ऐकल्यानंतर मला जी भूमिका खुणावते तीच भूमिका मी स्वीकारतो. तसेच त्या भूमिकेमध्ये शंभर टक्के रंग भरण्याचा माझा प्रयत्न असतो. चौर्य या चित्रपटातील माझी भूमिका पोलिस आॅफिसरची आहे.  पण हा पोलिस आॅफिसर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. ३. तुला या क्षेत्राचा अनुभव इतका दांडगा असून ही नवीन टीमसोबत काम करण्याचा  विचार कसा केला?- मी ज्या प्रकारच्या भूमिका स्विकारताना  भूमिकेच्या  लांबीचा कधी विचार करत नाही. ती किती उठावदार हे पाहतो. प्रेक्षकांनी माझी भूमिका दहा ते पंधरा वर्षानंतर पाहिली तरी ती भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली पाहिजे. अशाच भूमिका मी साकारतो.४. सध्या चर्चेत असलेल्या शनी शिंगणापूर या गावाशी या चित्रपटाचा संबंधित विषय असल्यामुळे चित्रपट स्वीकारताना काही विचार केला होता का?- बिलकूल नाही. पहिले तर शनि शिगणापूर या गावाशी संबंधित या चित्रपटाचा विषय  नाही. फक्त या  चित्रपटामध्ये एक आगळं वेगळं गाव आहे. त्या गावात घरांना दरवाजे नसतात. तिथल्या लोकांची श्रद्धा असते की, चोरी करणाºयांना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहोचतो. अंगावर शहारे आणणाºया या रहस्यमय घटनेतून सुरू होतो, चोर आणि श्रद्धेचा शोध. तसेच कलाकार म्हणून या समाजाचा मी भाग आहे. समाजापर्यत योग्य संदेश पोहोचविणे हाच माझा प्रयत्न आहे. यातून पळ काढणारा मी नाही. म्हणजेच तुम लढो हम कपडे संभालेगे यातला मी नाही.५. तांबडेबाबा या प्रसिद्ध भूमिकेनंतर तु बºयाच दिवस पडदयापासून दूर का होता?- तू तिथे मी या मालिकेतील तांबडेबाबांची भूमिका ही उठावदार होती. ही मालिका बंद होऊन तीन वर्षे झाली आहे. तरी या भूमिकेच्या स्वरूपात मी आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच मालिका असल्यामुळे ती साहिजकच दिवसातून चार ते पाच वेळी टेलिव्हिजवर दिसत असते. त्या तुलनेत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जावं लागतं. दरम्यानच्या काळात मी टेलिव्हिजनपासून दूर असलो तरी, चित्रपटात काम करत होतो. ६. तांबेडबाबा म्हणून प्रेक्षकांनी तुला निगेटिव्ह भूमिकेत ही प्रेम दिले याविषयी काय सांगशील-  निगेटिव्ह भूमिकेत ही मला हिरो बनविले या गोष्टीचे मला खरंच समाधान आहे. कलाकार हा प्रेक्षकांच्या प्रेमा मुळेचअसतो. तांबडेबाबा या भूमिकेतून मला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचता आले. याासाठी लेखक, दिग्दर्शक आणि  पूर्ण टीमचा मी आभारी आहे. या भुमिकेमुळे लहान मुलांपासून ते शंभर वर्षाच्या आजीपर्यत सगळेच मला ओळखत आहे त्यामुळे माझ्यासाठी हीच यशाची पावती आहे.७. चौर्य या संपूर्ण नवीन टीमसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?-  या चित्रपटातील सर्व नवीन कलाकार एफटीआय या महाविदयालयातील आहेत. त्यांनी तंत्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे त्यांना सगळ््याच गोष्टीची सखोल माहिती असते.  मी देखील याच महाविदयालयाचा विदयार्थी असल्याने या सगळ््यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे.