Join us  

बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:39 PM

बोल्ड दृश्यांमुळे 'टकाटक' मराठी चित्रपटाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे.

बोल्ड दृश्यांमुळे 'टकाटक' मराठी चित्रपटाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक २’चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘टकाटक’ची कथा तरूणाईवर आधारित होती. यासोबतच या चित्रपटात एक सशक्य मेसेजही दडला होता, त्यामुळे ‘टकाटक २’ या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक २’मधील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक २’च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. ‘टकाटक २’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली एक फ्रेश प्रेमकथा पहायला मिळणार आहे. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रूचेल, पटेल, भावेल असं काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांना नक्कीच आवडेल अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :टकाटकप्रथमेश परब