Join us  

'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी सुबोध भावे झाला रणदीपचा आवाज; पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:10 AM

रणदीपने साकारलेल्या सावरकरांना मराठीत सुबोध भावेने आवाज दिलाय. यानिमित्त सुबोधने सर्वांना एक खास आठवणही सांगितली आहे. सुबोध काय म्हणाला? वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटला आहे. आज २९ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीत रिलीज होत आहे. त्यामुळे मराठी रसिकप्रेक्षकांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीत रिलीज होत असताना एक खास गोष्ट समोर येतोय. एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने रणदीप हूडाने साकारलेल्या सावरकरांना आवाज दिलाय. हा अभिनेता म्हणजे सुबोध भावे.

सुबोध भावेने यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. सुबोध लिहीतो, "आजपासून सर्वत्र सावरकर हा चित्रपट मराठी मध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या "वीर सावरकर " या चित्रपटात मी एका ब्रिटिश पोलिस ऑफिसरची छोटीशी भुमिका केली होती. आणि आज रणदीप हुडा अभिनीत "सावरकर " या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठी मध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली."

सुबोध भावे पुढे लिहितो, "आवर्जून हा चित्रपट पहा. केवळ विनायक दामोदर सावरकर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची ही कहाणी.ही प्रखर देशभक्त सावरकरांची कहाणी. रणदीप हुडा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहे. त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला एक अभिनेता म्हणुन मनापासून सलाम." 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला मराठी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :रणदीप हुडासुबोध भावे विनायक दामोदर सावरकर