Swapnil Joshi Tesla Cybertruck: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या स्वप्निलने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. स्वप्नील जोशीला देखील महागड्या गाड्यांची आवड असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. अशातच स्वप्निल जोशीने इंस्टाग्रामवर Tesla Cybertruck सोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांच्या उत्सुकतेला भर घातली आहे.
स्वप्नीलनं टेस्लाकारसोबतचे फोटो पोस्ट करत "ही तुझ्यासाठी आहे राघव! टेस्ला सायबरट्रक" असं कॅप्शन दिलंय. स्वप्नीलच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो आहे. अनेकांनी स्वप्नीलला नवीन कार घेतली म्हणून अभिनंदन केलंय. तर काहींन काहींनी मजेशीर कॉमेंट्स केल्यात.
एकाने लिहलं, "घेतली काय? भावा एक चक्कर देना". तर आणखी एका युजरनं विचारलं, "ही कार तुझी आहे का?". दरम्यान ही कार स्वप्निलची नसून गुजरातच्या सूरत येथील एका उद्योजकाची आहे, अशी माहिती समोर आली आहे. स्वप्निल जोशीने त्या उद्योजकाला भेट दिली असावी आणि त्याच वेळी हा फोटो घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतामध्ये Tesla Cybertruck अधिकृतपणे उपलब्ध नसल्यामुळे ती आयात करावी लागते.
स्वप्नीलकडे आहे रेंज रोव्हर डिफेंडर, जॅग्वार
स्वप्नीलकडं कोटींच्या घरात असेलली रेंज रोव्हर डिफेंडर ही आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये अभिनेत्यानं ही लक्झरी कार खरेदी केली होती. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी स्वप्नीलनं जॅग्वार ही अलिशान कार खरेदी केली होती. दरम्यान, ब्लॉकबस्टर चित्रपट, सातत्यपूर्ण काम आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा स्वप्नील येणाऱ्या वर्षात देखील खूप चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे.