Join us  

सुयश टिळकची पत्नी आयुषी झळकणार रशियन अभिनेत्यासोबत, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 4:45 PM

अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Aayushi Bhave) हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं.

अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Aayushi Bhave) हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. सोशल मीडिया दोघंही अ‍ॅक्टिव्ह. 

दरम्यान आयुषी टिळक पहिल्यांदाच "पोर ब्युटिफुल" या म्युझिक व्हिडिओमधून आपल्या भेटीस आली आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये चमकत आहे. 

"पोर ब्युटिफुल" हा म्युझिक व्हिडिओ युट्यूबद्वारे लाँच करण्यात येणार आहे. श्रेयश राज आंगणे  यांनी या म्युझिक व्हिडिओचं गीत लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर अमित बाईंग यांनी नृत्य दिग्दर्शन आणि म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. "तुला बघून म्हणतोय आईना, पोर ब्युटिफुल हाय ना..." असे हलकेफुलके शब्द आणि उडती चाल यामुळे हे गाणं नक्कीच संगीतप्रेमींना आवडेल. या गाण्याचं छायांकन हरेश सावंत यांनी सांभाळले असून अन्य तांत्रिक बाजूही उत्तम असल्यानं गाणं प्रेक्षणीय झालं आहे. वसईच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत अनेक परदेशी कलाकार म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले असले, तरी रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :सुयश टिळक