Join us

सुव्रत जोशी सांगतो, मैत्रिचं नातं हे समानतेचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 16:09 IST

 मैत्रिचं नातं हे नेहमीच समानतेचं असतं. या नात्यात स्त्री-पुरुष, गरिब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. मैत्रिच्या नात्यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांना आदर ...

 मैत्रिचं नातं हे नेहमीच समानतेचं असतं. या नात्यात स्त्री-पुरुष, गरिब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. मैत्रिच्या नात्यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांना आदर देऊ शकतात. व त्यांना एकमेकांच्या हक्कांची जाणीव असते. मात्र आपल्या समाजातील मोठ्या पुरुष वर्गाला मैत्रिणीच नाहीत ही भयानक बाब असल्याचं मत अभिनेता सुव्रत जोशी याने व्यक्त केलं.  स्त्री-पुरुष समानता व लैंगिकता यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा हा लाडका कलाकार बोलत होता. त्याच्यासोबत अभिनेत्री सखी गोखलेदेखील होती. अगदी मोकळेपणाने व तरुणांच्या भाषेत त्यांच्याशी समरस होऊन या दोघांनी आपल्या संवादातून अनेक मुद्यांना स्पर्श केला.          स्त्री पुरुष समानते विषयी बोलताना सुव्रत म्हणाला, स्त्री-पुरुष समानता ही वेगवेगळ््या पातळ््यांवर वेगवेगळ््या पद्धतीने हाताळाव्या लागतील. स्वत:ला आलेला अनुभव सांगताना तो म्हणाला, आमच्या शाळेमध्ये मुलांच्या व मुलींच्या वर्गखोल्यांच्या मध्ये जाळी होती. शाळा कोएड असली तरी मुला-मुलींना संवाद साधायला परवानगी नव्हती, मुलींशी माझी मैत्री झाल्यानंतर मला स्त्रीयांबाबत अधिक आदर वाटू लागला. मैत्रीमध्ये जेंडर ही फार छोटी बाब राहते. स्त्री-पुरुष नात्यातील गूढपणा काढून टाकायला हवा.              सेन्सॉरशिप विषयी बोलताना तो म्हणाला, मी सेन्सॉरशिपच्या विरोधात आहे. सेन्सॉरशिपमुळे सिनेमातील अल्टरनेटीव्ह नॅरेटिव्ह मारले जातात. लैंगिकतेविषयी तो म्हणाला, आपल्या समाजात तरुणांसाठी सामाजिक. मानसिक स्पेस दिली जात नाही. मुलींचा स्पर्श हा नेहमी लैंगिकच असतो हा समज अगदी चुकीचा आहे. स्पर्शाचा अर्थ तरुणांनी समजून घ्यायला हवा. सुव्रत हा दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. तसेच तो लवकरच अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबतदेखील एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.