Join us  

युनिव्हर्सल स्टुडिओत सुव्रत जोशी करतोय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:30 PM

सुव्रतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो युनिव्हर्सल स्टुडिओत दिसत असून या फोटोत तो खूपच खूश आहे.

ठळक मुद्देसध्या सुव्रत अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या प्रयोगांसाठी अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात या नाटकांचे प्रयोग होत असून सगळ्याच प्रयोगांना रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने रसिकांचं तुफान मनोरंजन केले. तरुणाईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मालिकेतील हे कलाकारही तरुण आणि बिनधास्त असल्याने या सगळ्या कलाकारांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतील एक पात्र म्हणजे सुजय साठे. अभिनेता सुव्रत जोशीने साकारलेला सुजय रसिकांना चांगलाच भावला. त्याने या मालिकेनंतर अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केले असले तरी प्रेक्षक आजही त्याला सुजय या नावानेच ओळखतात.

सुव्रतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो युनिव्हर्सल स्टुडिओत दिसत असून या फोटोत तो खूपच खूश आहे. सध्या सुव्रत अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या प्रयोगांसाठी अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात या नाटकांचे प्रयोग होत असून सगळ्याच प्रयोगांना रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रयोगांच्या दरम्यान वेळ काढून या नाटकाची टीम अमेरिकेत फेरफटका मारताना दिसत आहे.

अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक आहे. या नाटकाला सगळ्याच वयोगटातील लोकांची पसंती मिळत आहे. तरुणाईला भावणाऱ्या या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकात सखी गोखले महत्त्वाची भूमिका बजावत होती. पण सखी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली असल्याने तिला या नाटकाला रामराम ठोकावा लागला. नाटकातून एक्झिट घेत असले तरी हे नाटक नावाप्रमाणे ‘अमर’ राहणार आहे असं सखीने त्यावेळी म्हटले होते. या नाटकातून नाइलाजाने बाहेर पडत असले तरी हे नाटक सुरू रहावं अशी इच्छा तिने हे नाटक सोडताना व्यक्त केली होती. 

कलाकारखाना प्रस्तुत आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले आहे आणि या नाटकाच्या लेखिका मनस्विनी लता रविंद्र आहेत.

टॅग्स :अमर फोटो स्टुडिओसुव्रत जोशी