Join us

नव्या कलाकारांसाठी सुयशचे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 15:01 IST

 अभिनेता सुयश टिळक नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी अग्रेसर असल्याचे आपण वारंवार पाहिले आहे. आता सुयश मराठी चित्रपटसृष्टीत येऊ पाहणाºया ...

 अभिनेता सुयश टिळक नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी अग्रेसर असल्याचे आपण वारंवार पाहिले आहे. आता सुयश मराठी चित्रपटसृष्टीत येऊ पाहणाºया नवीन कलाकारांसाठी काहीतरी करु इच्छीत असल्याचे समजतेय. नवीन कलाकारांना कधी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही. तर अनेकदा या मायानगरीत येणाºया नवीन ताºयांना चुकीच्या माणसांमुळे भरकटावेही लागते. अनेकदा या कलाकारांची कामाच्या निमित्ताने फसवणूक होते. तर बºयाच तरुण मुलींना अगदी कास्टींग काऊचचा सामना देखील करावा लागतो. आता या नवीन कलाकारांसाठी सुयश उभा राहणार असल्याचे समजतेय. परंतू तो त्यांच्यासाठी काय करणार याचा उलगडा आत्ताच होणार नाहीये. पण सुयशच्या या एका चांगल्या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टीला भावी काळात दर्जेदार कलाकार मिळणार एवढे मात्र खरे. आता तो या कलाकारांसाठी काय करणार हे तुम्हाला पुढील वर्षीच समजणार आहे.