सुयश टिळकला मिळाली ब्लू स्टिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 15:42 IST
कलाकारांसाठी ब्लू स्टिक मिळणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण सोशलमीडियाच्या माध्यमातून कलाकारांना मिळालेल्या ब्लू स्टिक आधारित चाहत्यांचा अंदाज ...
सुयश टिळकला मिळाली ब्लू स्टिक
कलाकारांसाठी ब्लू स्टिक मिळणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण सोशलमीडियाच्या माध्यमातून कलाकारांना मिळालेल्या ब्लू स्टिक आधारित चाहत्यांचा अंदाज कळत असतो. आणि कलाकारांसाठी चाहते खूप महत्वाचे असतात. कारण शेवटी चाहते आहेत म्हणूनच कलाकार आहेत. नुकतेच अभिनेता अमेय वाघ याला ब्लूक स्टिक मिळाली होती. आता त्याच्यापाठोपाठ प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुयश टिळक यालादेखील सोशलमीडियावर ब्लू स्टिक मिळाली आहे. त्याला ही ब्लू स्टिक इन्स्टाग्रामवर मिळाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुयश खूपच आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्याने नुकतेच सोशलमीडियावर इन्स्टाग्राम टीमचे आभार मानले आहे. त्याचबरोबर त्याच्या टेक्नीकल टीमचेदेखील कौतुक केले आहे. तसेच फायनली इन्स्टाग्रामचे हे व्हेरिफिकेशन पाहून मी ही सरप्राईज असल्याचे त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले. सुयशला मिळालेली ही ब्लूक स्टिक पाहता, त्याच्या चाहत्यांनादेखील आनंद झाला असणार हे नक्की. त्याच्या या ब्लू स्टिकसाठी त्याच्या चाहत्यांनीदेखील सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. सुयशने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तो का रे दुरावा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच सुयश टिळक आणि सुरूची आडारकर ही जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळाली. या मालिकेनंतर ही जोडी स्टॉबेरी या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर दिसली. त्यांच्या या नाटकानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले. आता, सुयश टिळक हा सख्या रे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.