Join us

​ सुयशला मिळाला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 11:49 IST

अभिनेता सुयश टिळक सध्या चांगलाच खुश आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण सुयशला एक पुरस्कार मिळाला आहे. आणि ...

अभिनेता सुयश टिळक सध्या चांगलाच खुश आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण सुयशला एक पुरस्कार मिळाला आहे. आणि तो पुस्कार त्याला त्याच्या शाळेने दिला असल्याने सुयशच आनंद द्वीगुणीत झाला आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना सुयशने शाळेविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, सुयश सांगतो, आपटे प्रशालेने मला  माणसे जोडायला शिकवले त्यामुळे चित्रपटसृष्टीत मी अनेक माणस जोडू शकलो. मी जिथे -जिथे काम करतो तिथे तिथे माझे एक नवीन कुटुंब  तयार होते. हे फक्त शा़ळेमुळचे असे मत अभिनेता सुयश टिळक यांने व्यक्त केले. विद्या महामंडळ संस्थेच्या वर्धापन दिना निमित्त आपटे प्रशालेतील आयोजित पुरस्कार वितरण सोहळया प्रसंगी तो बोलत होता. आपटे प्रशालेमार्फत दरवर्षी संस्थेतून घडलेल्या माजी विद्याथीर्ना पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार देण्यात येतो. सुयश टिळक यंदाच्या पुरस्कारांचा मानकरी ठरला.या प्रसंगी सुयश ने शाळेतील जुन्या आठवणीना उजाळा दिला. सुयश पुढे बोलताना म्हणाला मी नोकरी मागणारा होणार नाही तर मी नोकरी देणारा होणार आहे.या शाळेच्या भिंतीवरील सुविचारामुळे मी या क्षेत्राकडे वळालो. शालेय जीवनातील शिक्षकांचा माझ्यावर खुप प्रभाव पडला त्यांच्यातील अनेक गुण माझ्या अंगी भिणले आहेत. या प्रसंगी सुयश चे बाबा विश्वजीत टिळक व यशराज काळे, देविका रानडे, हर्षदा वाळिंबे या सुयश च्या वर्ग मित्र मौत्रीणींनी मनोगत व्यक्त केले. सुयशच्या शिक्षिक सुचरिता  पोेरे यांनी देखील सुयश च्या शालेय जीवनातील गमंती-जंमती सर्वांसमोर व्यकत केल्या. सुयशला मिळालेला हा पुरस्कार नक्कीच त्याच्या पुढील कामासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. लवकरच तो प्रेक्षकांना एका मालिकेमध्ये दिसणार आहे.