Join us  

एक लाजरा न साजरा मुखडा, तेजस्विनी पंडीतच्या या फोटोला कॅप्शन सुचवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:16 PM

तेजस्विनी पंडीतच्या या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. 

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते.

 

शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना कॅप्शन सुचवायला सांगितली आहे. तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं.शेअर केलेल्या फोटो तेजस्विनीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. मराठमोळ्या पद्धतीने नेसलेली पारंपरिक मराठी साडी,  दागिने, नाकात नथ, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे तेजस्विनीनचं सौंदर्य खुलून गेले आहे.

ताई, सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये; राष्ट्रवादीचं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रत्युत्तर

तेजस्विनीच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी कांग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील ’ सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणाऱ्या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण ही बाबच मुळात चुकीची असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे रात्रंदिवस एक करून या महामारीत लोकांना वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करताना आपण पाहत आहोत. याहीपुढे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आईचे निधन झाल्यानंतरही त्यांनी दु:खाचा क्षण बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आपला परिवार समजून वाचवण्यासाठी कसरत सुरू ठेवली आहे. खरंच त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडित