Join us  

सुबोध भावेने तिच्यासाठी लिहिले होते रक्ताने पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 6:13 PM

सुबोध कॉलेजमध्ये असताना त्याने चक्क एका मुलीसाठी रक्ताने पत्र लिहिले होते. त्यानेच ही गोष्ट नवरा असावा तर असा या कार्यक्रमात सांगितली.

ठळक मुद्देकॉलेजमध्ये असताना सुबोधला सिगारेट पिण्याचे व्यसन लागले होते आणि ही गोष्ट मंजिरीला अजिबात आवडत नव्हती. एकदा मंजिरी समोर असतानाच सुबोधने सिगारेट पेटवली हे पाहाताच मंजिरी नाराज होऊन तिथून निघून गेली होती. मंजिरीने त्याच्यासोबत अबोला धरला होता. या गोष्टीचा पश्चाताप झाल्याने पुन्हा सिगारेट ओढणार नाही असे त्याने मनाशी ठरवले आणि स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मंजिरीची माफी मागितली आणि पुन्हा सिगारेटला हात लावणार नाही असे वचन देखील दिले. 

नवरा असावा तर असा या कार्यक्रमात नुकतीच प्रसाद ओक आणि सुबोध भावे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्स शेअर केली. या कार्यक्रमात सुबोधने सांगितलेली एक गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुबोध कॉलेजमध्ये असताना त्याने चक्क एका मुलीसाठी रक्ताने पत्र लिहिले होते. ही मुलगी दुसरी कोणीही नसून त्याची पत्नी मंजिरी आहे. 

मंजिरीसाठी सुबोधने रक्ताने पत्र का लिहिले होते याचे कारण देखील खूपच रंजक आहे. कॉलेजमध्ये असताना सुबोधला सिगारेट पिण्याचे व्यसन लागले होते आणि ही गोष्ट मंजिरीला अजिबात आवडत नव्हती. एकदा मंजिरी समोर असतानाच सुबोधने सिगारेट पेटवली हे पाहाताच मंजिरी नाराज होऊन तिथून निघून गेली होती. मंजिरीने त्याच्यासोबत अबोला धरला होता. या गोष्टीचा पश्चाताप झाल्याने पुन्हा सिगारेट ओढणार नाही असे त्याने मनाशी ठरवले आणि स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मंजिरीची माफी मागितली आणि पुन्हा सिगारेटला हात लावणार नाही असे वचन देखील दिले. 

सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुबोधला अभिनय येत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेजचे काम करत होता तर मंजिरी नाटकात काम करत होती. तिला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच त्याने मंजिरीला प्रपोज केले होते. त्या दोघांची शाळा वेगळी होती. त्यामुळे सुबोध मंजिरीला पाहण्यासाठी नाक्यावर उभा राहायचा. त्यावेळी त्यांच्यात केवळ नजरानजर व्हायची. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत मंजिरीला प्रपोज केले होते. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली आणि सुबोधला उत्तर मिळाले. अशाप्रकारे त्यांची प्रेमकथा सुरू झाली. 

टॅग्स :सुबोध भावे