Join us  

सुबोध भावेने पूरग्रस्तांना दिलेले ते वचन पाळलं, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:48 AM

सुबोध भावेने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना दिलेले आपलं वचन पाळलं आहे.

सुबोध भावेने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना दिलेले आपलं वचन पाळलं आहे. सुबोधने अश्रूंची झाल फुले नाटकातून जमलेले 2 लाख 45 हजार 425 रुपयांची मदत पूरग्रस्तांना केली आहे. रंगमंच कामगार संघाकडून 75 हजारांची मदत पूरग्रस्ताना केली आहे.  तसेच स्वत:च्या मानधनातून सुबोधने 1 लाख 25 हजारांची मदत रंगमंच कामगार संघाला दिले. 

कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थितीत निर्माण झाल्यावर सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात त्याने लिहिले होते की, ''ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही. आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत.'' सुबोधने दिलेले वचन पाळलं आहे. काही दिवसांपूर्वीच सुबोधची निवड महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक  विकास महामंडळाच्या  संचालक मंडळावर संचालकपदी करण्यात आली आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर,  लवकरच तो नवीन भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'विजेता' या सिनेमातून तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी सुबोध खूप मेहनत घेतो आहे. नुकताच या सिनेमाचा मुह्रुर्त पार पडला. अमोल शेडगे  या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

टॅग्स :सुबोध भावे