Join us  

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सुबोध भावे आला धावून, अशा रितीने देतोय मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 10:47 AM

सध्या महाराष्ट्रातील अनेक राज्यात पुराची स्थिती आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हात  महापुर आला आहे. या पुरात लाखो लोक अडकली आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक राज्यात पुराची स्थिती आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हात  महापुर आला आहे. या पुरात लाखो लोक अडकली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कर आणि नौसेनाचे जवान त्या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करतात. या महाप्रयलायत तिथल्या नागरिकांचे संसार वाहून गेले आहेत.

सर्वस्तरातून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याचे सर्वस्तरातून आवाहन करण्यात येते आहे. या मराठी कलाकाराही मागे नाहीत अभिनेता सुबोध भावे यांने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमीच तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्याने दिला आहे. सुबोधने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं.सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन पुढील काही दिवसात संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांसाठी निश्चित आणि ठोस अशा जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देतील.अधिक माहिती पुढील २ दिवसात.''

याशिवाय सुबोधने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे यात तो म्हणतो, ''ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही. आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत.''

मिळालेल्या माहितीनुसार  'अश्रूंची झाली फुले नाटका'च्या पुढच्या प्रयोगाचे संपूर्ण पैसे सुबोध आणि त्याची टीम पूरग्रस्तांना देणार आहे. सुबोधशिवाय इतर मराठी कलाकारनीही कोल्हापूर, सांगलीमधील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. सुबोधने उचलेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. 

टॅग्स :सुबोध भावे कोल्हापूर पूरसांगली पूर