Join us  

'टाईमपास'मधील सोज्वळ प्राजूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, दिवसेंदिवस दिसतेय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 7:00 AM

Ketaki Mategaonkar : ९ वर्षांत प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळतो आहे.

२०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास (Timepass) चित्रपटातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने साकारली होती. ९ वर्षांत प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकरमध्ये खूपच मोठा बदल झालेला पाहायला मिळतो आहे. केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा तिने सोशल मीडियावरील पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. यातील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की टाईमपासमधील सोज्वळ प्राजू आत भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.

केतकी माटेगावकरचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीचाही बोलबाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विविध फोटोशूटमधून केतकी आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांचे लक्ष वेधून घेत असते.

केतकी सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. प्रसाद ओक सोबत 'मीरा' या चित्रपटात केतकीची भूमिका आहे. याचे शूट नुकतेच पार पडले. याशिवाय केतकी काही दिवसांपूर्वीच स्वीत्झर्लंड वरुन परतली आहे. तिथे ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटसाठी गेली होती. मात्र हा चित्रपट कोणता याचा खुलासा अद्याप केतकीने केलेला नाही.

टॅग्स :केतकी माटेगावकर