Join us

​ खेळाडुच्या संघर्षमय कहाणीचे वलय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 14:56 IST

खेळाडुंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. बॉलिवूडच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीला देखील खेळांची भूरळ पडू लागली आहे. ...

खेळाडुंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. बॉलिवूडच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीला देखील खेळांची भूरळ पडू लागली आहे. प्रेक्षकांना एखादया खेळाविषयी किंवा खेळाडुंची आत्मकथा रुपेरी पडदयावर पाहायला आवडते. दंगल, सुलतान, एम एस धोनी अशा हिंदी चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाने घेतल होती. आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील एका खेळाडुच्या संघर्षाची कहाणी उलगडणारा चित्रपट लवकरच येत आहे. आयुष्यात ध्येयप्राप्तीपर्यंतचा मार्ग कधीच सोपा नसतो. प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनुभवाची हीच शिदोरी यशाच्या मार्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असते. कोणतंही क्षेत्र त्याला अपवाद नाही. खेळाडूलासुद्धा या संघषार्चा सामना करावाच लागतो. अशाच एका गुणी खेळाडूच्या संघषार्ची कहाणी सांगणारा वलय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला विशाखा मिडिया वर्क्स निर्मिती आहे.  तर  निकी बत्रा यांनी हा सिनेमा  दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण पूर्ण झालेले आहे. तर काही भागांचे शूटिंग नुकतेच फिल्मसिटी मध्ये करण्यात आले आहे. तसेच नागपूरमध्ये देखील या चित्रपटाचा काही भाग चित्रीत केला जाणार आहे. अशोक कुंदनानी निर्मित वलय या चित्रपटात अनिकेत केळकर, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, अमिषा आंबेकर, प्रदीप पाटील, अनिकेत मोगरे, प्रतीक भोसले, वैभव आमटे, अमित लेखवानी, सायरा खान, पूजा बनसोडे, रुसान शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. वलय चित्रपटाचे गीतलेखन व संगीत प्रकाश प्रभाकर यांचे आहे. आता पाहूयात या चित्रपटातील खेळाडुची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्ष करते का?