Join us  

"दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त"; जन्माष्टमीनिमित्त स्पृहा जोशीची कविता चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:55 PM

जन्माष्टमी आणि पावसाचा संबंध लावत अभिनेत्री स्पृहा जोशीने एक कविता शेअर केली आहे. 

गोकुळाष्टमीचा सण म्हणजे राज्यभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी थरावर थर रचत गोविंदांनी सलामी दिली आहे. अ दहीहंडीच्या उत्साहात, गोविंदाचा जल्लोष ओसंडून वाहत आहे. त्यातच वरुणराजाने कालपासून हजेरी लावल्याने गोविदांचा भर पावसात जल्लोष सुरु आहे. यानिमित्ताने जन्माष्टमी आणि पावसाचा संबंध लावत अभिनेत्री स्पृहा जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. 

 स्पृहाने शेअर केलेली कविता

“दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस?की पाऊस होऊन येतोस?सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेचपण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात…तुझा सारासारविचार टोचला असतास आमच्या बुद्धीला…आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!इथली फार काळजी करू नको..दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्तबाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..”

स्पृहाची ही कविता सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. चाहते तिच्या कवितेचं भरभरुन कौतूक करत आहेत.  स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास स्पृहा जोशीमराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

उत्तम अभिनयासह स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवयित्रीदेखील आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच स्पृहा लोकमान्य या मालिकेत झळकली होती. परंतु, नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

 
टॅग्स :स्पृहा जोशीमराठीमराठी अभिनेता