Join us  

ऐकावं ते नवलच...! कुशल बद्रिकेच्या घरात राहतो स्पायडर मॅन, पहा त्याचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 11:51 AM

कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिकेच्या घरी राहतो स्पायडर मॅन.

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचे मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचे कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. 

कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याने म्हटलं की, आमच्या घरात एक स्पायडर मॅन राहतो. ज्याच्या जाळ्यात आमचं अख्खं विश्व गुंतलंय. 

हा स्पायडर मॅन म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा मुलगा आहे. त्याने स्पायडर मॅनवाला पाँचो बीच टॉवेल घातला आहे आणि फोटोसाठी पोझ दिली आहे. हा फोटो शेअर करीत त्याला घरातील स्पायडर मॅन असं संबोधलं आहे.

भाऊ आणि कुशल सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधत असतात.

सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण ते रसिकांसह शेअर करतात. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या