Join us  

सोनू, श्रेया आणि अमितराज 'देवा' मधून प्रथमच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 9:30 AM

'देवा' या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'रोज रोज नव्याने' हे गाणे लॉच झाले.इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स ...

'देवा' या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'रोज रोज नव्याने' हे गाणे लॉच झाले.इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या गाण्यामुळे शिगेला पोहोचली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमातील या रॉमेंटीक गाण्याला सोनु निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज लाभला आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. विशेष म्हणजे, 'रोज रोज नव्याने' या गाण्यांमार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही संगीतविश्वातील जोडी प्रथमच 'देवा' या सिनेमातून एकत्र आली आहे.प्रेमीयुगुलांना पर्वणी ठरत असलेले हे गाणे, श्रेयालादेखील पसंत असून, हे गाणे माझे फेव्हरेट साँग असल्याचे ती सांगते. येत्या १ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अंकुश -तेजस्विनीबरोबरच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळणार आहेत.सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना  देवा या आगामी मराठी सिनेमाने मात्र वेगळी वाट धरलीय.मोठा गाजावाजा न करता शांततेत देवा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.आता तुम्हीही विचारात पडला असणार की शांततेत जोरदार प्रमोशन कसं बरं होत असेल ? तस होय, देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून,ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसून येत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची अशी होत असलेली प्रसिद्धी,प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरत आहे.