Join us

ब्लॅक ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय स्टनिंग, फोटो पाहून म्हणाल - अप्सरा आली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 10:40 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच सोनालीने तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतेय.  सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंना तुफान पसंती मिळत असून दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच होती. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र आता ती मुंबईत परतली असून तिच्यासोबत कुणालही इथे आला आहे. कुणाल दुबईमध्ये राहतो सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी