Join us  

सोनाली कुलकर्णीची 'ती' पोस्ट होतेय व्हायरल, 'BREAKING NEWS…' म्हणत शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:56 AM

Sonalee Kulkarni:सोशल मीडियावरील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ती कुणाल बेनोडेकर सोबत लग्नबंधनात अडकली आणि नंतर तिसऱ्या हनीमूनसाठी मेक्सिकोला गेली होती. तिथल्या बिकनी लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सोशल मीडियावरील अभिनेत्रीचे बिकनीतील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. तिने ब्रेकिंग न्यूज म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ब्रेकिंग न्यूज. १५ जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तमाशा LIVE होणार.. या व्हिडीओत तिचा आगामी चित्रपट तमाशा लाइव्ह(Tamasha Live)ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चं टिझर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची उत्सुकता खूप वाढली होती. प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र आता ‘तमाशा लाईव्ह’साठी प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण येत्या १५ जुलै रोजी हा चित्रपटप्रदर्शित होणार आहे. 

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी सोबत सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी