Join us

कुछ तो आ रहा है

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 13:51 IST

मराठी इंडस्ट्रीला सरप्राईज देण्याची चाहूल लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे या चंदेरी दुनियेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि श्रुती ...

मराठी इंडस्ट्रीला सरप्राईज देण्याची चाहूल लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे या चंदेरी दुनियेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि श्रुती मराठे यांनी विवाहबंधनात अडकून त्यांच्या चाहत्यांना सरप्राईजच दिले आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी सरप्राईज असल्याचे सांगत आहे. आता हेच पाहा ना, ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी अभिनेता स्वप्नील जोशी आणि बॉलिवुडचा तगडा कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तसेच त्यांनी स्वप्नील जोशी, गणेश आचार्य आणि गॅग असे म्हणत त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून कुछ तो लेके आ रहे है असे म्हणत चाहत्यांना कोडयात अडकवले आहे. त्याच्या या आगामी प्रोजेक्टविषयी अभिनेते जयवंत वाडकर लोकमत सीएनएक्सला सांगतात, हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या आगामी प्रोजेक्टविषयी प्रेक्षकांना नक्कीच एक ते दोन दिवसात कळेलच असे ही यावेळी त्यांनी सांगितले. अदयाप सर्वच गोष्टी गुलदस्त्यात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मात्र गणेश आचार्य आणि स्वप्नील जोशी यांचा एकत्रित फोटो पाहता स्वप्नीलचा झक्कास डान्स पाहायला मिळणार या विचाराने प्रेक्षकांनीदेखील डोळे मोठे केले आहेत. तसेच त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहे. स्वप्नीलने यापूर्वी मराठी चित्रपटसृष्ट्रीला दुनियादारी, मुंबई पुणे मुंबई, वेलकम जिंदगी, मितवा, लाल इश्क असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. तसेच त्याचे फुगे आणि वारस हे चित्रपटच्या प्रतिक्षेतदेखील त्याचे चाहते आहेत.