Join us
Daily Top 2Weekly Top 5

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील काही खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 12:46 IST

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे चौथे सत्र. पहिले पुष्प गुंफायचा मान श्रीमती धनाश्री घैसास यांना मिळाला. बंदिशीचे काव्य हे ...

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे चौथे सत्र. पहिले पुष्प गुंफायचा मान श्रीमती धनाश्री घैसास यांना मिळाला. बंदिशीचे काव्य हे स्वरांइतकेच महत्त्वाचे असते. त्यानेच गायन हे समृद्ध होत असते हे या गुणी गायिकेने रसिकांना दाखवून दिले. बहुतेक यथोचित घसीट, गमक बोलतानाचे प्रकार दाखवून नंतर द्रुत गंधर्व ठेका, त्रितालात- जा जारे अपने मंदिरवा ही चीज खूप लडिवाळ स्वरोच्चाराने सादर केली. तसेच द्रुत एकतालात याच रागात तराणा खटक्याच्या तानांनी विशेष रंगला.शेवटी नजरिया लागे नही कही ओर हा  दादरा सादर करून आपले देखणे गायन थांबविले. आश्वासक तबलासाथ पुष्कराज जोशी तर स्वरसंवादिनीवर सिद्धेशबिचोलकर यांची. श्रुतींवर- अनुजा भावे, वैशाली कुबेर यांची होती.यानंतर या स्वरमहोत्सवाचे सर्वेसर्वा पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन त्यांचे सुपुत्र विराज जोशी यांच्या साथीत झाले. सुरुवातीस यमन हा राग सादरीकरणासाठी निवडला होता. लालन के संग ही विलंबित एकतालात बांधलेली बंदिश दमदारपणे सादर केली. लक्ष्य मोहन व आयुष मोहन यांनी सुरुवातीस जोग रागात आलाप, जोड, झाला पद्धतीने गत सादर केली. सरोदचे विलंबित थेट काळजाला भिडले. दोघांचे अप्रतिम असे रसायन जमून गेले आहे. मत्त तालातील गत अनेकवेळा उत्स्फूर्त दाद घेऊन गेली. शेवटी पं. रविशंकरांची प्रसिद्ध माँज खमाज गत त्रितालात सवाल जबाबासह रसिकांची वाहवा घेऊन गेली. लोकाग्रहास्तव मांड रागातील धून सादर करून हे वादन थांबले. मध्य लय त्रिताल पंडितजींनी ह्यमोरी गगर ना भरन देह ही चीज ताकदीने गायली. खडा भरदार आवाज, सारंगीची सुरेख साथ भावली. याच रागातील तराणा हा त्रितालात, खटक्या मुरक्या तंत अंगाने गायला. गाण्यातले पौरुष, घरंदाजपणा काय असतो हे या पिता-पुत्रांनी दाखवून दिले.