Join us  

म्हणून सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर दिसल्या एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 9:04 AM

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या कॉम्पेटिशनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.मग त्यांचे अगदी 'फिगर इन' राहणं असो किंवा ...

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या कॉम्पेटिशनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.मग त्यांचे अगदी 'फिगर इन' राहणं असो किंवा रेड कार्पेटवर एकसे बढकर एक स्टाईल स्टेटमेंट करणं दोघीही सध्या एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे.परंतु ह्या दोघी एकत्र पब्लिक अँपिअरन्स देतानाही दिसत आहेत.नुकतंच एका बॉलिवूड फॅशन ब्लॉगरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ह्या दोघीनी एकत्र उपस्थिती लावली.सगळ्याच बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सर्वांची फेव्हरेट असणाऱ्या  मिस मालिनीच्या पुस्तक सोहळ्यात मराठीतल्या दोन हॉट फेव्हरिट्सने हजेरी लावली होती.मिस मालिनी बॉलिवूड विश्वातली एक नावाजलेली फॅशन ब्लॉगर आहे. अगदी शाहरुख खान, अक्षय कुमार पासून  विद्या बालन, इरफान खान सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटी मिस मालिनीच्या मुलाखतीमध्ये, सोशल मीडियावर विशेष उपस्थिती लावतात. प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आवर्जून 'मिस मालिनी'ची भेट घेतात.काही दिवसांपासून मराठीतल्या ह्या दोन कलाकारांची विशेष उपस्थिती जाणवली ती मिस मालिनीच्या सोशल मीडियावर जाणवत आहे.मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ह्या दोघींना ही विशेष आमंत्रण होतं.सई आणि अमृता दोघीही मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होत्या. आणि दोघीनीही एकत्र फोटोज ही क्लीक  केले.शिवाय पुन्हा एकदा दोघीनी परिधान केलेले ड्रेस मिस मालिनीच्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.बॉलिवूडच्या हया मांदियाळीत ह्या दोन मराठी अभिनेत्रीनी लावलेली हि उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. Also Read:सई ताम्हणकर चाहत्यांना देणार नवीनवर्षाची भेट!नवीन वर्षाची भेट म्हणून सई लवकरच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. राक्षस सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज  करण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.आता पर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली,परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील. लई भारी नंतर शरद केळकरचा हा दुसरा मराठी चित्रपट असेल ज्यात तो सई ताम्हणकर सोबत दिसणार आहे.