Join us  

लंडनच्या रस्त्यावर स्नेहल तरडे पडल्या प्रवीण यांच्या पाया, का ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 7:10 PM

Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे (Pravin Tarde). देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडे यादेखील अभिनेत्री दरम्यान आता त्यांनी सोशल मीडियावर गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. 

स्नेहल तरडेंनी इंस्टाग्रामवर प्रवीण तरडेंच्या पाया पडतानाचा एक फोटो शेअर केला आहे.  प्रवीण , स्नेहल आणि त्यांच्या मित्रांची टीम विदेशात ट्रिपवर गेले होते. त्यावेळी राणीच्या घरासमोर पीट्याभाई म्हणजेच रमेश परदेशीने त्यांचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. या फोटोमागचे कारण सांगताना स्नेहल सांगतात की, तर झालं असं, की गेल्या वर्षी लंडनला गेलो असताना windsor castle अर्थात राणीचे घर पहायला बाहेर पडलो होतो. फोटोज , रिल्स हे असे सगळे आधुनिक सोपस्कार सुरु असतानाच प्रविणचा फोन खणखणायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की आज तर गुरुपौर्णिमा! मग सगळं जिथल्या तिथे थांबवून, होतो तिथेच वाकले आणि माझ्या गुरुसख्याचा आशिर्वाद घेतला. पिट्याने त्वरेने हा क्षण कॅमेरात कैद केला.

स्नेहल आणि प्रवीण हे कॉलेजपासूनचे चांगले मित्रस्नेहल आणि प्रवीण हे कॉलेजपासूनचे चांगले मित्र दोघांनी घरच्यांच्या संमतीने थाटात लग्न केले. प्रवीण सोबतच्या दहा वर्षांच्या सुखी या संसारबद्दल स्नेहल भावुक होऊन म्हणाली होती की, एखादी स्त्री जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिचं आयुष्य एका दिवसात पूर्णत: बदलतं. तिच्या मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, भौगोलिक, काही प्रकरणी आर्थिक परिस्थितीत अमूलाग्र बदल घडलेला असतो. या सर्व बदलांशी जुळवून घेणं शिकत असतानाच नवीन जबाबदाऱ्या देखील तिच्यावर येऊन पडतात. 

 तर मी कुठेही आनंदीच असेन...बरं वयही असं असतं की त्यावेळी करिअर सुद्धा महत्वाच्या टप्प्यावर आलेलं असतं. हे बदल, सांसारिक जबाबदाऱ्या, करिअर असं सगळं आणि इतरही बरंच काही ती मनापासून स्वीकारत, सांभाळते ते त्या एका माणसाच्या जीवावर ज्याच्यावर तिचा जीव जडलेला असतो. त्याची साथ मिळाली, त्याच्याकडून चार प्रेमाचे शब्द मिळाले, ती जे काही करते आहे त्याची जाणीव त्याला आहे इतकं जरी तिच्यापर्यंत पोहोचलं तरी कितीही मोठं अग्निदिव्य ती हसत हसत पार करते. मी खूप भाग्यवान आहे की, ती जाणीव तुला आहे हे तू केवळ एकांतातच नाही तर एका मोठ्या सोशल प्लॅटफॉर्म वर उघडपणे सांगतो आहेस. तुझ्या या शब्दांच्या जीवावर, आपल्याला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक होण्यासाठी मला जे जे काही करता येईल ते सर्व मी मनापासून करेन. मग तू मला एखादया महालात नेऊन ठेव किंवा एखादया झोपडीत.. जर तुझी साथ मिळणार असेल तर मी कुठेही आनंदीच असेन, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :प्रवीण तरडे