Join us  

कंगनाच्या पंगामध्ये दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 6:30 AM

स्मिता तांबेने जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासारख्या विविध मराठी सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.

ठळक मुद्दे'पंगा' हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहेस्मिता तांबेने जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळसारख्या सिनेमात काम केलं आहे

स्मिता तांबेने जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासारख्या विविध मराठी सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. मराठीसोबतच स्मिताने हिंदीतदेखील काम केलं आहे. लवकरच कंगना राणौतसोबत दिसणार आहे. कंगनाच्या पंगा सिनेमात लवकरच दिसणार आहे. याआधी ही कंगनाने सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुड सिनेमांमध्ये काम केले आहे.  

'पंगा' हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहे. 'पंगा'मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.  अश्विनी अय्यर तिवारी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमासाठी कंगना वजन देखील वाढवले आहे.  कंगना आणि स्मिताशिवाय यात नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

स्केक्रेट गेम्स २नंतर  स्मिता पुन्हा एकदा वेबसिरीजमध्ये सुद्धा झळकणार आहे.  'हवा बदले हसू' या वेबसिरीजमध्ये स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे.  आरती ही  पर्यावरण शास्त्रात पी.एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. ही एक विज्ञान-पर्यावरणपूरक थ्रिलर सिरिज आहे. 'सावट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे.

टॅग्स :कंगना राणौतस्मिता तांबे