Join us  

​स्मिता सांगतेय, हिंदी इंडस्ट्रीत ओळखीवर चालतात कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 9:57 AM

स्मिता तांबेने ७२ मैल, परतू यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नूर या हिंदी चित्रपटात तिने साकारलेल्या ...

स्मिता तांबेने ७२ मैल, परतू यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नूर या हिंदी चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. आता ती रुख या चित्रपटात प्रेक्षकांना नुकतीच पाहायला मिळाली. स्मिताने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचसोबत ती हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हिंदीत काम करताना स्मिताला अनेक चांगले वाईट अनुभव आले आहेत. काही वेळा तर ऑडिशन दिल्यानंतर तिला शॉर्ट लिस्टही करण्यात आले. पण शेवटच्या क्षणी ती भूमिका कोणत्या दुसऱ्याच अभिनेत्रीला मिळाली. याविषयी स्मिता सांगते, हिंदीत काम करायचे असे मी अनेक महिन्यांपासून ठरवले होते. मी मराठीत आजवर अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे एखादी चांगली भूमिका असल्यास मराठीतील निर्माते-दिग्दर्शक माझा विचार करणार याची मला खात्री आहे. पण हिंदीत तसे नाहीये. हिंदीत काम करण्यासाठी मला खूपच मेहनत घ्यावी लागते. हिंदीत काम करायचे असे ठरवल्यापासूनच मी अनेक लोकांना भेटत आहे. तसेच मी आजवर अनेक ऑडिशन्स दिली आहेत. ऑडिशन्सचा अनुभव देखील खूपच वेगळा असल्याचे मला जाणवले. अनेक वेळा ऑडिशन्स खूप चांगले होऊन मला शॉर्टलिस्ट देखील करण्यात आले. ती भूमिका मला मिळणारच असे मला वाटत असतानाच शेवटच्या क्षणी ती भूमिका माझ्या हातून दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आली. ती भूमिका निर्माते-दिग्दर्शक यांच्या ओळखीच्या लोकांना अथवा त्यांच्या मैत्रिणींना मिळाली. खरे तर या सगळ्या गोष्टी पाहून मी खचून जायला पाहिजे होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी हार पत्करली नाही आणि त्याचमुळे आज मला खूप चांगले चित्रपट मिळत आहेत.आज स्मिता हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना दोन्ही चित्रपटसृष्टीत तिला काहीच फरक जाणवत नाही. केवळ मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटामुळे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचतो असे स्मिता सांगते. Also Read : मेहनतीमुळेच यश मिळवू शकलेः स्मिता तांबे