Join us

स्मिता गोंदकरने केले हॉट PhotoShoot

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:56 IST

'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत स्मिताने ...

'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत स्मिताने रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही स्मिता कायम चर्चेत असते. पप्पी दे पारुला या गाण्यातील बिकीनी परिधान केलेल्या स्मिताचा हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. स्मिता कायमच विविध फोटोशूटमधून आपला ग्लॅमरस आणि तितकाच बोल्ड अंदाज रसिकांपुढे घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा तिचा सेक्सी आणि हॉट अंदाज समोर आला आहे. एका फोटोशूटमध्ये स्मिताचा हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे. यांत स्मिताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.बॅकलेस अशा ड्रेसमध्ये स्मिताचं सौंदर्य आणखी खुलल्याचं पाहायला मिळत आहे.काळ्या रंगाचा बॅकड्रॉपवर हे फोटोशूट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोटो जितका हॉट, सेक्सी आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्मिताचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे. तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.कधी स्विम सूटमध्ये तर कधी अन्य हॉट अंदाजातील तिचे फोटोशूट समोर आले होतं. याआधी प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने स्मिताची सेक्सी अदा आपल्या कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद केली होती. दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.स्मिताच्या या हॉट-सेक्सी तरी त्यातील काहीसे वेगळेपण असणा-या फोटोला रसिकही डोक्यावर घेतील यांत शंका नाही.