Join us

छोट्या पडद्यावरील शालू वहिनीचा हा हॉट अंदाज तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 14:00 IST

गुलाबी नक्षीदार वनपीसने माधवी निमकरच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिचा हा सेक्सी लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडू लागला आहे.

अभिनेत्री आपल्या मादक अदा आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. त्यांच्या ग्लॅमरस अदा रसिकांना क्लीन बोल्ड करतात. कॅमेऱ्याच्या आणि खासकरुन रसिकांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री काहीच कसर सोडत नाहीत. अभिनेत्रींच्या भूमिका, फोटोशूट, इव्हेंट्स आणि फॅशन शोमध्ये याची प्रचिती येते. हेच फोटो या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसह शेअर करतात. या फोटोंना सोशल मीडियावर रसिकांकडून पसंती मिळते. अभिनेत्री माधवी निमकरचा असाच एक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर फॅन्सना भावतो आहे. या फोटोमध्ये माधवी निमकरचा सेक्सी आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. गुलाबी नक्षीदार वनपीसने माधवी निमकरच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिचा हा सेक्सी लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडू लागला आहे. माधवी निमकरची भूमिका असलेली हम तो तेरे आशिक है ही मालिका छोट्या पडद्यावर रसिकांचं धम्माल मनोरंजन करत आहे. या मालिकेतून अभिनेत्री माधवी निमकर हिनेही रसिकांची मने जिंकलीत. या मालिकेत माधवीने साकारलेली शालिनी रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. या मालिकेतील ग्लॅमरस आणि स्टायलिश शालिनीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील तिचा हा अंदाज घराघरातील रसिकांना भावला. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही शालिनी अर्थात माधवी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. छोट्या पडद्यावरील शालू वहिनी अर्थात माधवीला फिटनेसचेही वेड आहे. मालिकेत झुंबा डान्स घेणारी शालू खऱ्या आयुष्यात देखील तितकीच फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. याआधी अवघाची संसार, जावई विकत घेणे, स्वप्नांच्या पलीकडले या मालिका आणि संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करुन भागलं, धावाधाव, बायकोच्या नकळत या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत.