Join us  

मुला ऐवजी मुलगी झाल्याच्या रागात आईनेच फिरवले होते तोंड, नकुशी आज आहे आघाडीची गायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:33 PM

‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

एका सच्चा कलाकाराला त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी एका माध्यमाची आणि पाठिंब्याची गरज असते. नावातच मंगल असलेल्या ‘मंगली’ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. मंगलीचे मूळ नाव सत्यवती मुडावत, जन्म आंध्रप्रदेश सध्या तेलंगना राज्यातला. जन्मापासूनच स्वत:च्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठीचा मंगलीचा संघर्ष ते टॉलीवूडमधील सप्तगिरी, शैलेजा रेडी अल्लुडू, राज महाल, निधी नाडीओके  कथा व अला वैकुंठरमल्ले (२०१९) या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील रामुलो रामला या गाण्याला मिळालेले तब्बल २०० मिलिअन व्ह्युजच्या रुपातून मिळालेले यश. असा हा मंगलीचा यशाच्या मार्गाकडे होणारा प्रवास आता लवकरच आणखी एका नव्या आणि वेगळ्या वळणावर येणार आहे.

अनेकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी मंगली ही अप्रतिम गायिका तर आहेच पण त्याचबरोबर ती सुंदर अभिनेत्री देखील आहे. आणि आता ती लवकरच मराठी सिनेमा पदार्पण करणार आहे.  दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटात मंगली आपल्या गोड आवाजाचा आणि अभिनयाचा ठसा उमटवणार आहे. ‘कती तू बंजारा’ या गाण्यामार्फत मंगली आपला मराठमोळा प्रवास सुरु करत आहे. मंगलीचा मधयुक्त स्वर,  गोर बंजारा समाजातील सिंधू संस्कृतीची झलक व बॉलिवूडचे सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शक विष्णु देवा ‘कती तू बंजारा’ हे गाणं नक्कीच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात निवास करेल यात शंका नाही.

मंगली या गाण्यात नृत्य पण करणार आहे. ‘कती तू बंजारा’ हे गाणं प्रसिध्द ‘गीतांजली’ या गोर बंजारा अल्बममधील आहे. ९०च्या दशकात या अल्बमने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. संगीताला भाषेचं बंधन नसतं, या अल्बममधील गाणी गोरबोली भाषेत होती. या अल्बममधील गाणी एवढी अप्रतिम होती की सर्व समाजातील लोकांनी या अल्बमला भरपूर प्रेम दिलं. ‘आमदार निवास’ या त्यांच्या आगामी मराठी सिनेमात त्या अल्बममधील ‘कती तू बंजारा’ हे गाणं चित्रित केलं.

मंगलीच्या आई-वडीलांना १२वर्षे कोणतेही अपत्य नव्हते. दवाखाना, वैद्य, नवस, पूजा, मंदिर हे करत करत शेवटी १२ वर्षानंतर त्यांना मंगलीच्या रुपाने मुलगी झाली. या १२ वर्षाच्या तपाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मंगलीच्या आईने १२ वर्षे आपल्या पायात चप्पल घातली नाही. पण एवढ्या तपानंतरही मुला ऐवजी मुलगी झाली याचा राग तिच्या आईला आला व तीन दिवस तिने मंगलीपासून तोंड फिरवले. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे मुलगी ही दोन्ही गोष्टींमुळे मंगलीला संघर्ष करावा लागला.

पण सुदैवाने, मंगलीला साथ मिळाली आपल्या मधुर आवाजाची आणि आपल्या वडिलांची आणि वारसा म्हणून गोर बंजारा समाजातील सुंदर, सुरेख प्राचीन लोक गीताची. तोच वारसा मंगलीने जपला व संगीत आणि कला क्षेत्रात  आपली कारकिर्द घडविण्याचा निश्चय केला. कलेला गुणवत्ता व परिश्रमाबरोबर शिक्षणाची साथ मिळावी म्हणून मंगलीने कर्नाटक म्युझिकमध्ये एस.व्ही.युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा केला. आता मंगलीची गायन आणि अभिनय कला ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.