अमृता फडणवीस यांनी गायले डाव या चित्रपटासाठी गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 13:52 IST
गायिका अमृता फडणवीस यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. आता त्या पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटासाठी गाणार ...
अमृता फडणवीस यांनी गायले डाव या चित्रपटासाठी गाणे
गायिका अमृता फडणवीस यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. आता त्या पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटासाठी गाणार आहेत. डाव या चित्रपटातील पाठलाग हे गाणे त्या गाणार असून त्यांनी या गाण्यासाठी नुकतेच रेकॉर्डिंग केले आहे. पाठलाग असे गाण्याचे बोल ऐकून ते नेमका कोणाचा आणि कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच? त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे.रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखीदूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाचीअसे बोल असलेल्या या गीताचे रेकोर्डिंग करण्याचा या दोघांचा अनुभव खूपच चांगला होता. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. डाव या सिनेमातील ‘पाठलाग’ हे थ्रिलर साँग गायिका अमृता फडणवीस यांनी गायले असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केले आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रोमांचकारी भयाने खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाचे हे शीर्षक गीत मंदार चोळकरने लिहिले आहे. या गीतासाठी ‘जॅझ’ पीसचा वापर केल्याने हे गीत आशयातील गूढता आणखीन वाढवते.जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गीत एक थरारक अनुभव देईल, असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृता यांनी ज्या खुबीने हे गीत गायले आहे, ते अंतर्मनाचा ठाव घेईल असा विश्वास संगीतकार जीत गांगुली व्यक्त करतात. यासोबत मराठी चित्रपटासाठी संगीत देण्याचा एक वेगळाच आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांच्या मते हे गीत तसेच हा सिनेमाही प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा असेल.डाव या थरारपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनी लिहिले असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.Also Read : आलिया भटने अमृता फडणवीसह'गायले तेरी गलियाँ' हे गाणे