Join us

​शुभांगी यांनी केली आईची इच्छा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:01 IST

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजविणाऱ्या शुभांगी लाटकर यांनी नुकतीच त्यांच्या आईची एक इच्छा ...

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजविणाऱ्या शुभांगी लाटकर यांनी नुकतीच त्यांच्या आईची एक इच्छा पूर्ण केली आहे. नुकतेच शुभांगींच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईची इच्छा होती कि त्यांनी मराठीत काम कारावे आणि त्यांनी ही इच्छा  पूर्ण केली. फिल्म फार्म प्रोडक्शनच्या गोठ या मालिकेत त्या दिसणार आहेत. याविषयी शुभांगी सांगतात, माझी आई मला नेहमीच सपोर्ट करायची माझ्या सगळ्या मालिका ती बघायची. तिला मराठी मालिका बघायला खूप आवडायच्या आणि म्हणूनच जेव्हा मला गोठ या मालिकेबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा मी लगेच होकार दिला. माझ्या आईला जेव्हा मी मराठी मालिका करतेय हे कळले तेव्हा तीदेखील फार आनंदी झाली. माझ्यासाठी हा टिव्ही शो स्वीकारणे म्हणजे खरच फार अवघड होते. कारण मी सध्या संयुक्त हा टिव्ही शो करत आहे. त्याच्या सर्व डेट्स आधीच फायनल झाल्या होत्या. शिवाय मला संयुक्तसाठी दिवसातील १२ तास शूट काम करावे लागते. अशातच या दुसऱ्या टिव्ही शोसाठी वेळ देणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. मला हा शो कसाही करुन करायचाच आहे हे मी माझ्या प्रोडक्शन हाऊसला सांगितले त्यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि मग  गोठ साठी वेळ काढला असल्याचे शुभांगी म्हणाल्या. शुभांगी आशिकी 2, डेली बेली, बॉडीगार्ड, सिंघम रिर्टन्स यासारख्या चित्रपटातून आपल्याला दिसल्या होत्या.