Join us

श्रृती मराठे अभिनेत्री नसती एअर होस्टेस बनून फिरली असती जग,हा ड्रीम रेल साकारण्याचीही आहे इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:57 IST

प्रत्येक कलाकाराची त्याच्या अभिनय कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची इच्छा असते.या भूमिकेद्वारे आपलं वेगळेपण सिद्ध व्हावं आणि कलाकार म्हणून असलेले ...

प्रत्येक कलाकाराची त्याच्या अभिनय कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची इच्छा असते.या भूमिकेद्वारे आपलं वेगळेपण सिद्ध व्हावं आणि कलाकार म्हणून असलेले गुण समोर यावे अशी प्रत्येक कलाकाराला वाटतं.त्यामुळे प्रत्येकाचा कोणता ना कोणता ड्रीम रोल असतो.अभिनेत्री श्रृती मराठेचाही असाच एक ड्रीम रोल आहे.श्रृतीला भविष्यात रानी मुखर्जीने साकारलेला 'ब्लॅक' सिनेमातील रोल करण्याची इच्छा आहे.रानीने साकारलेली ही भूमिका श्रृतीला भावली होती.त्यामुळे अशी भूमिका साकारण्याचं स्वप्न आहे असं श्रृतीने म्हटलं आहे. याशिवाय अभिनेत्री नसती तर एअर होस्टेस झाले असते असे श्रृतीने म्हटले आहे.त्यानिमित्ताने जग फिरता आले असते असं तिने सांगितले आहे.सध्या श्रृतीची 'जागो मोहन प्यारे' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे.अभिनेता अतुल परचुरे,अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. या मालिकेत मोहनच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी श्रृतीने साकारलेली भानु रसिकांना चांगलीच भावते आहे. श्रृतीचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.श्रृतीची ही मालिका हिट ठरत असली तरी तिने रुपेरी पडदाही गाजवला आहे.मराठीसह दाक्षिणात्य सिनेमात तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. मालिकांप्रमाणे तिच्या या भूमिका रसिकांना भावल्या आहेत.cnxoldfiles/a>या फोटोमध्ये श्रृती आणि तिचा भाऊ पाहायला मिळत आहे. बालपणीचा श्रृतीचा अंदाज कुणालाही मोहून टाकेल असाच आहे. भावाबहिणींचं नातं हे अनोखं असतं. रुसवेफुगवे, भांडणं आणि खूप सारं प्रेम म्हणजे भावाबहिणीचं नातं. असंच प्रेम श्रृती आणि तिच्या भावामध्येही आहे. हेच प्रेम या फोटोतही पाहायला मिळत आहे.