Join us  

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी-थापडी'चा टीजरला मिळतोय दमदार प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 7:27 PM

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्या आपडी थापडी या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्या आपडी थापडी या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. एक मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल. 

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीता करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे. 

अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं. त्यामुळे टीजर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. 'आपडी-थापडी' ही एक मनोरंजक कथा सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल. 

टॅग्स :श्रेयस तळपदेमुक्ता बर्वे