Join us

बाबो..! सिनेइंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 19:20 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीने तिला सिनेइंडस्ट्रीत आलेल्या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे.

सिनेइंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. या झगमगत्या दुनियेत काम मिळवण्यासाठी काहींना कास्टिंग काऊचसारख्या गोष्टींनाही सामोरे जावे लागते. तर कित्येक जण काम मिळवण्यासाठी धडपडत असतात. तसेच या इंडस्ट्रीत गॉडफादरची गरज असते, असे बोलले जाते. या क्षेत्रात कलाकारांना चांगल्या वाईट गोष्टी, चांगले वाईट अनुभव येत असतात. सिनेइंडस्ट्रीही त्याला अपवाद नाही. या क्षेत्रातील काही कलाकार त्यांना आलेले वाईट-चांगले अनुभव शेअर करत असतात. असाच अनुभव अभिनेत्री मीनल बाळ (Minal Bal) हिने शेअर केला आहे.

अभिनेत्री मीनल बाळ हिने फेसबुकवर पोस्टमध्ये लिहिले की, प्रामाणिकपणे खूप मनापासून  सिंसीयरली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड,संयम,श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है!!! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा,एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम .मग काय कामावर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही . तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा. आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग. शू.....कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते... आपलं सिक्रेट. 

ती पुढे म्हणाली की, रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तुन का, कौआ मोती खाएगा. ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही,किंवा मला आक्षेप नाही.

मीनलने केलेल्या या पोस्टवर आलेल्या कमेंटमध्ये कोणी या प्रकाराला दुजोरा दिला आहे तर कोणी मीनल तू अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तू उत्कृष्ट कलाकार आहेस त्यामुळे तुला चांगल्या मार्गानेच काम मिळेल असा सल्लाही दिला आहे. तर अनेकांनी मनोरंजन क्षेत्रातील या चुकीच्या गोष्टींचा निषेधही केला आहे.मीनल बाळ हिने आजपर्यंत अनेक मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.