शिवानी सुर्वे का म्हणते पागल है
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 11:51 IST
सध्या फोटो हा प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय असतो. म्हणून हल्ली प्रत्येकजण फोटोशूटदेखील मोठया प्रमाणात करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
शिवानी सुर्वे का म्हणते पागल है
सध्या फोटो हा प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय असतो. म्हणून हल्ली प्रत्येकजण फोटोशूटदेखील मोठया प्रमाणात करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सोशलमीडियावर आपले हटके फोटो दिसावे यासाठीदेखील हटके पोझ देऊन फोटो काढण्याच्या प्रेमात सगळयात पडले असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहाना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देखील अशाच हटके पोझच्या प्रेमात पडलेली सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच सोशलमीडियावर एक झक्कास फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिने पागलपंती करत असल्याची पोझ दिली आहे. त्याचबरोबर पागल है क्या, हा पागल है अशी पोस्टदेखील लिहीली आहे. ती सध्या जाना ना दिल से दूर या हिंदी मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असते. या मालिकेतील तिचा सहकलाकार विक्रमसिंग चौहानदेखील तिच्यासोबत या पागलपंतीच्या फोटोमध्ये दिसत आहे. त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांनीदेखील त्यांच्या या फोटोवर अधिक कमेंन्ट दिली असल्याचे दिसत आहेत. शिवानी सुर्वे यापूर्वी देवयानी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. तसेच या मालिकेचा तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग आज ही प्रेक्षक विसरले नाही. तसेच शिवानीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. फुलवा, नव्या, अनामिका या हिंदी मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर मराठीमध्ये ती सुंदर माझं घर, तू जीवासा गुंतवावे या मालिकेतदेखील मुख्य भूमिकेत झळकली होती.