बारावी नापास आहेत छाया कदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 12:25 IST
सैराट या चित्रपटातील परश्या आणि आर्ची संसार करायला घर देणाºया अक्का या बारावी नापास आहेत. आश्चर्य वाटले ना, पण ...
बारावी नापास आहेत छाया कदम
सैराट या चित्रपटातील परश्या आणि आर्ची संसार करायला घर देणाºया अक्का या बारावी नापास आहेत. आश्चर्य वाटले ना, पण त्यावेळी त्या खचल्या नाहीत. अपयशावर मात करत त्यांनी लढण्याचा मार्ग स्वीकारला. नुकताच दहावी-बारावीचा रिझल्ट जाहीर झाला. यावर त्या म्हणाल्या, मुलांनो अपयश मिळालं तरी खचू नका. आत्महत्येसारखे मार्ग पत्कारू नका. अभ्यास, मार्क्स हे आयुष्यात सर्वकाही नसते. जगात खूप सारे वेगवेगळे क्षेत्र आहे. ती तुमची वाट पाहत आहेत.अभ्यासापेक्षा ही तुमची आवड इतर क्षेत्रात असेल तर त्याला नक्कीच शंभर टक्के दया. कारण जिथे आवड असते, तिथेच रमतो माणूस. पालकांनी ही मुलांची आवड पाहून त्याला त्या त्या क्षेत्रात जाण्यासाठी सपोर्ट करा. असा संदेश अभिनेत्री छाया कदम यांनी मुलांना दिला आहे.