Join us

​‘फुंतरु’ चा बनणार सिक्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 06:26 IST

मराठीतला पहिला सायन्स फिक्शन चित्रपट ‘फुंतरु’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आता ‘फुंतरू’चा सिक्वल बनविण्याच्या विचारात आहेत. चित्रपट ...

मराठीतला पहिला सायन्स फिक्शन चित्रपट ‘फुंतरु’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आता ‘फुंतरू’चा सिक्वल बनविण्याच्या विचारात आहेत. चित्रपट संपवताना ‘फुंतरू-२’ ची अधिकृती स्वत: चित्रपट निर्मातेच एन्डस्क्रोलच्या अगोदर दाखवताय, म्हटल्यावर आता याविषयी उत्सुकता वाढली आहे. दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाला, फुंतरु बनवितानाच माझ्या डोक्यात ‘फुंतरु २’ आणि ‘फुंतरू-३’ हे चित्रपट तयार आहेत. हा मराठीतला पहिला सायन्स फिक्शन चित्रपट असल्याने बिग बजेट चित्रपट आहे. आणि हा चित्रपट करणे हे निर्मात्यासाठी मोठी रिस्क असते. आता फुंतरुचा पहिल्या एक दोन आठवड्यातला प्रतिसादच ठरवेले की हा चित्रपट पूढे बनवायचा का नाही.