करून नमन मराठी रयतेच्या तेजस्वी सूर्याला, आपल्या शिवबाला...सादर करतो 'ती तलवार' गाण्याची पहिली झलक! #BKMK#तीतलवार#पोवाडा#3FEBpic.twitter.com/62zBszbFaZ— @bkmk_film (@bkmk_film) December 19, 2016
बघतोस काय मुजरा कर मधील हा पोवाडा झाला प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 13:59 IST
हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस सिनेवतुर्ळात चालली होती. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ...
बघतोस काय मुजरा कर मधील हा पोवाडा झाला प्रदर्शित
हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस सिनेवतुर्ळात चालली होती. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टिझर पाहता या चित्रपटात नक्कीच काहीतरी भन्नाय असणार याची कल्पनाच येते. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या चित्रपटातून देण्यात येणार असल्याचे हेमंत ढोमे याने सांगितले होते. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाच्या नावावरुन लगेच लक्षात येते की हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार किंवा त्यांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करुन सध्याच्या पिढीला मार्गदर्शन करणारा असावा.. माज्या राजाला, माज्या शिवबाला मानाचा मुजरा...चला महाराष्ट्राचं वैभव परत आणुया... असं म्हणत नुकतच या सिनेमाचं नवीन टिझर पोस्टर प्रदर्शित केलं होत. आणि आता या चित्रपटातील पोवाडा देखील प्रदर्शित झाला आहे. पोवाड्याचे बोल ऐकता अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अनिकेत विश्वासराव आणि रसिका धबडगावकर हे दोघेही या पोवाडयामध्ये दिसत आहेत. सहयाद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा असे बोल असलेला हा पोवाडा आता सर्वांच्या ओठी आला आहे. या चित्रपटाची तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण ३ फेब्रुवारी २०१७ ला सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज देखील झाला आहे. महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे आपण? जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं? असे कित्येक प्रश्न या टिझर मध्ये विचारण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार आहे. फक्त आता तुम्हाला काहीच दिवस महाराजांची ही शौर्य गाथा पाहण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.